Peshawai Munj

Stage 2

आपल्या मुलाची मुंज म्हणल्यावर सगळ्यांना ती खूप थाटामाटात करायची इच्छा असते… म्हणूनच पाटणकर इव्हेंट्स कडे आलेल्या प्रत्येक आई-बाबांची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी “पेशवाई” मुंजीची संकल्पना सुरु केली…

पेशवाई मुंजीची सुरुवात होते ती बटूच्या छत्रचामर मिरवणुकीपासून… हा एक नयनरम्य सोहळा असतो.. संपूर्ण पारंपरिक वेशभूषेत शोभणारा इवलासा बटू.. अंगात पेशवाई थाटाचा अंगरखा, तसेच धोतर, डोक्यावर पगडी, आणि कानांत भिकबाळी अशा थाटात मंडपाकडे प्रस्थान करतो.. आप्तजनांमधल्या सुवासिनी चिरंजीव बटूचा औक्षण करतात. वामनमूर्ती चिरंजीव बटूवर पाकळ्यांचा वर्षाव केला जातो.. अशा शाही थाटात बटूचे मंडपात आगमन होते.. बटू स्टेजवर आल्यावर बटूची आई त्याचे औक्षण करते आणि बाबा कानमंत्र देतात… त्याचवेळी बटूच्या मामाचे स्टेजवर आगमन होते आणि मामा बटूला उचलून पालखीत बसवतो.. आणि पालखीतून बटूला मुंजीसाठी वाजतगाजत बोहल्यावर आणले जाते…