Munj Sanskar

Theme Munj in Pune

Patankar Events – Munj Services in Pune-161

मौंजीबंधन हा आपल्याकडील एक पारंपरिक संस्कार आहे…. तो अत्यंत महत्वपूर्ण आणि गंभीर असा संस्कार आहे… आपल्या वेदांमध्ये आयुष्याच्या चार अवस्था वर्णिल्या आहेत… त्यापैकी प्रथम अवस्था ब्रम्हचर्य…  हिचा प्रारंभ मौंजीबंधनाच्या पारंपरिक संस्काराने होतो… या संस्कारानंतर बालकाचे लाडाकोडाचे घरगुती जीवन संपून तो गुरुगृही विद्याभ्यासासाठी जातो.. एक प्रकारचे खडतर, कष्टप्रद जीवन जगतो आणि आगीतून भाजून तेजःपुंज होणाया सोन्याप्रमाणे या जीवनातूनच त्याचे अध्ययन चालू राहाते.. आजकाल अशा प्रकारची गुरुगृहे किंवा खडतर अध्ययनाची संकल्पना शहरी भागात तरी आढळून येत नाही… त्याचप्रमाणे असे दिसते कि मुंज हा एक सोहळा समजून जमलेल्या अनेक लोकांचे समोर चाललेल्या संस्कारांपेक्षा आपापसातील गाठीभेटी आणि गप्पांमध्येयच अधिक लक्ष असते.. परंतु पाटणकर इव्हेंट्सतर्फे आम्ही या संस्काराच्या जास्तीत जास्त मुळापर्यंत जाऊन त्यातील प्रत्येक बाबीचे महत्व उपस्थित लोकांना समजावे आणि त्यायोगे त्यांनाही या सोहळ्याचा आनंद घेता यावा यासाठी प्रयन्त्नशील आहोत..