5D Munj Page text-min

03_What is 5D Munja-min

04_Batu-min

व्रतबंधासाठी योग्य मुहूर्त आणि समजेल असा संपूर्ण शास्त्रोक्त संस्कार विधी.

संस्कारांवर आधारित कल्पक, भव्य, देखणा आणि मंत्रमुग्ध करणारा नृत्य – संगीत – नाटय आविष्कार!

आधुनिक, निसर्गरम्य वातावरणात मुंजकार्य सजवणारं अनोखं नियोजन जणू डेस्टिनेशन मुंजच!

रुचकर भोजन, सहज सोपा प्रवास, आनंददायी निवास… विविध वयोगटासाठी धम्माल पिकनिक!

पाटणकर इव्हेंटसचा ५ वर्षाचा संस्मरणीय कार्यनियोजनाचा विश्वासार्ह आणि समृद्ध सांस्कृतिक अनुभव!

व्रतबंध… नक्की कशासाठी?

वेदकाळापासून मानवी मनावर विशिष्ठ संस्कार घडविण्याची आपली, दैदिप्यमान आणि सर्व जगाने अनुसरावी अशी, समृद्ध परंपरा आहे . या संस्कार परंपरेतील एक लखलखता, तेजोमय संस्कार म्हणजे व्रतबंध. व्रतबंध, मुंज, मौजीबंधन, उपनयन अशा विविध नावांनी ओळखला जाणारा हा संस्कार.

Patankar Events 5D Munj - Theme

व्रतबंध आजचा

आजचे सुजाण पालक आपल्या समृद्ध संस्कारांना जतन करण्यासाठी आणि ते संस्कार पुढील पिढीकडे सोपविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अन्यथा, हे समृद्ध आणि वैविध्यपूर्ण, आदर्श व्यक्तिमत्व बनविण्यासाठी सहाय्यभूत असलेले संस्कार, लुप्त होण्याची भीती त्यांच्या मनात घर करते आहे. या पालकांना हे ठामपणे माहित आहे कि केवळ उच्चशिक्षण किंवा लठ्ठ वेतन मिळवून आपण देशाचे आदर्श नागरिक होत नाही, तर ज्या समाज्यात आपण वाढलो, त्या समाजाचे ऋण आपण यथायोग्य रीतीने फेडणे हेही तितकेच… किंबहूना त्याहून अधिक मह्त्वाचे आहे.

योग्य मुहूर्त

‘सुयोग्य मुहूर्त ‘ह्या संस्कारक्षम सोहळ्यासाठी मुहूर्ताच्या नेमकेपणाची चिंता करण्याचे अजिबात कारण नाही अशी निसंदिग्ध ग्वाही आम्ही देतो शास्त्रोक्त पद्धतीने विधी पूर्ण करत असताना बटूला संपूर्ण अर्थ उलगडून सांगण्यामागे, त्याला एक जबाबदार विध्यार्थी, आज्ञाधारक पुत्र आणि सुजाण नागरिक बनविणे, हेच उद्दिष्ट असते.

Patankar Events 5D Munj - Theme

संस्कारांवर आधारित विविध कल्पक थीम्समधले भव्य देखणे आणि मंत्रमुग्ध करणारे संगीत-नाट्य-नृत्य सादरीकरण.

बटूने पालखीत बसून मुंजमंडपी अवतरणे, परंपरागत पर्णकुटी, गुरूकुल, पेशवाई थाट ईत्यादी थीम्स, पारंपारिक पोषाखात असलेले आप्तजन, मेणा, पालखी, छत्रचामर, अब्दागिऱ्या इ.च्या रूपाने, उपस्थितांना एका वेगळ्याच जगात वावरल्याचा आनंद मिळतो.

मस्त -निसर्गरम्य, आधुनिक वातावरणात कार्य सजविणारं अनोखं नियोजन.. जणू डेस्टिनेशन मुंजच!

आपल्या शहरापासून अगदी १५-२० कि मी इतक्या कमी अंतरापासून ते अगदी गोव्यापर्यन्त ५० हून अधिक नवनवीन ठिकाणं आता ही ५डी मुंज सजवण्यास उत्सुक आहेत.

010_Vratabandha kashasathi-min

Patankar Events 5D Munj - Ruchkar Bhojan

रूचकर भोजन, सहज सोपा एकत्रित प्रवास, आनंददायी निवास… विविध वयोगटासाठी जणू धम्माल पिकनिकच!

पाटणकर इव्हेंटस्‌ ५ डी मुंज आणखीन एक भावनात्मक लाभ म्हणजे आप्तजन, मित्रपरिवार, सगेसोयरे यांचे मुंजविधीच्या प्रारंभापासून ते कार्य संपन्न होईपर्यंत एकत्र राहणे. एरवी शहराच्या धकाधकीत जेमतेम काही क्षण एकमेकांना भेटणारी मंडळी ५ डी मुंजीच्या निमित्ताने उत्साहात प्रवास करताना, मोकळ्या वातावरणात एकत्र निवासाची उत्तम आनंददायी मजा लुटतात. दीर्घकाळ एकत्र घालवल्याने नातेसंबंध अधिक दृढ होतात. या आनंद सोहळ्यात, केंद्रस्थानी असलेला बटू आपल्या नातलगांसोबत ऋणानुबंध अधिक मजबूत आणि अधिक अर्थपूर्ण करू शकतो. या सगळ्याला अर्थातच रुचकर भोजनाची जोड मिळते आणि आनंदाच्या रेशमी वस्त्राला भरजरी किनारच लाभते जणू.

पाटणकर इव्हेंटस्‌चा प्रदीर्घ अनुभव आणि उत्तमतेचा ध्यास आणि विश्वास!

अनेक संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून अनेक जाणकारांशी चर्चा करून, सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासू जेष्ठांच्या सूचना लक्षात घेऊन ह्या संस्कारक्षम आनंद सोहळ्याचे स्वरूप निश्चित केले आहे.

PORTFOLIO

[envira-gallery id=”13878″]

COMMENDATION

View all testimonials