Dohale Jewan

स्त्रीचे मन हे निसर्गतःच खूप हळुवार असते… माहेरच्या जिव्हाळ्यात, आई-वडिलांच्या मायेच्या छत्रात वाढलेली एक लाडकी लेक उपवर होते… तिला साजेसा जोडीदार मिळतो आणि ती त्या घराची लाडकी सून होते.. नव्या घरात रममाण झालेल्या सुनेला एक दिवस बाळराजाच्या आगमनाची चाहूल लागते आणि तिच्या मनाची चाफेकळी अजूनच खुलू लागते… घरातल्या सगळ्यांनाच डोहाळे जेवणाचे वेध लागतात.. भावी मातेच्या खुललेल्या मनाला अजूनच मोहरविणारा संगीत नृत्य आणि नाट्यांनी युक्त “एका मोहरलेल्या घरात …” एक सुंदर नाट्यानुभव “पाटणकर इव्हेंट्स” अतिशय नेत्रदीपक पद्धतीने सादर करतात…

 

Dohalejewan-12Dohalejewan-17